बैठकीस प्रतिनिधी व सदस्यांची भव्य उपस्थिती
नाशिक दिनकर गायकवाड आम्ही भारताचे लोक आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ,जिल्हा नाशिक यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रतिनिधी व जिल्हा सदस्यांची भव्य बैठक नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीच्या सुरुवातीस भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी संविधान मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.
यानंतर संघटनेचे ध्येय,आगामी उपक्रम,सामाजिक व शैक्षणिक कार्याची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्व प्रतिनिधी व सदस्यांनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमास संदेश शालिनी संभाजी कर्डक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी ठरला.
