नाशिक दिनकर गायकवाड प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर शरणपूर रोडवरील पोलिस कवायत मैदानात संचालन सराव करत असताना रविवारी नुकतेच अग्निशमन नारायण मधे (५६, रा. कर्मचारी दलातील लिडिंग फायरमन मोहन क्वार्टर,शिंगाडा तलाव) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते कोसळले.
कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना गंगापूर रोडवरील रुग्णालयात हलविले.मात्र,उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मैदानात रविवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सरावा दरम्यान अग्निशमन दलाच्या सिडको उपकेंद्रात कार्यरत असलेले मोहन मधे अचानकपणे त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
ही बाब लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सीपीआर' देत रुग्णालयात नेले
परेडचा सराव करताना माचिंग सुरू असतानाच अचानक चक्कर आल्याने कोसळले.
परेडप्रमुख लिडिंग फायरमन किशोर पाटील, फायरमन राजेश चौधरी, क्यूआरटी कमांडो यांनी धाव घेत तातडीने त्यांना रुग्णवाहिकेत टाकून 'सीपीआर' देत रुग्णालयात पोहोचविले होते. मधे यांची अग्निशमन दलात ३२ वर्षे सेवा झाली आहे.मात्र उपचारा दरम्यान त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी, दोन भाऊ, बहीण, असा परिवार आहे. घटनेने अग्निशमन दलामध्ये शोककळा पसरली आहे.
