नाशिक प्नतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त नुकतेच मालेगाव येथील कॉलेज स्टॉप परिसरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.या भीषण स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर जखमींना तातडीने नाशिक येथील के.आय.एम.एस मानवता रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.या पार्श्वभूमीवर नुकतेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी रुग्णांची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांना धीर दिला.
यावेळी जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासना मार्फत करण्यात येणार असं असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
सध्या सर्व जखमींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत आहे.
