संगीतमय कवायत आणि लेझिम ठरले प्रेक्षकांचे आकर्षण
नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील जिल्हा परिषद शाळेत,७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी खंबाळे गावाचे लोकनेतृत्व तथा उपसरपंच सौ.जिजाबाई आंधळे यांचे हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी सैन्य दलातील जवान सुदर्शन आंधळे हेही उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी,खंबाळे गावचे लोकनेतृत्व प्रथम नागरिक तथा सरपंच मिनानाथ डावरे,सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.नाईक साहेब, पोलिस पाटिल.भारत बोऱ्हाडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदिप खाडे हे उपस्थित होते.
यावेळी संगीतमय कवायत,लेझीम पथकचे संचालन झाले तसेच तालुका स्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष संदिप खाडे यांचेकडून यावेळी बक्षीसे देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांची खास करून उपस्थिती होती.संगीतमय कवायत आणि लेझिम प्रेक्षकांचे एक आकर्षण ठरले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एकनाथ खाडे यांनी केले.
