कोल्हार प्रतिनिधी 'विद्यार्थ्यांनी केवळ शालेय अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता आपला परिसर, जिल्हा, इतिहास व समाजाशी संबंधित सामान्य ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. बाहेरील जगाची जाण आणि सामाजिक भान असल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होत नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात सहभागी झाले पाहिजे. श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो,' असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा.यांनी केले.
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील 'लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या कालावधीत श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे 'विशेष श्रमसंस्कार शिबीर' आयोजित करण्यात आले आहे.
या श्रमसंस्कार शिबीराचे उदघाटन सी. शालिनी विखे पा. यांच्या हस्ते पडले.यावेळी सौ शालिनी विखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फत्याबादच्या सरपंच सौ ज्ञानेश्वरी पांडुरंग आठरे होत्या.
या कार्यक्रमासाठी संपतराव भाऊसाहेब चितळकर, भाऊसाहेब जाखुजी पा. वडीतके,. लक्ष्मण रामजी चिंधे, पांडुरंग शिवाजी आठरे, अशोक शेडाळे, गुणवंत आठरे, अनिल पलबडे, बाबासाहेब दळे, संभाजीराजे देवकर, भानुदास वडीतके,रमेश बेलकर, एस. टी. शेळके आदी मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर यांनी केले तर आभार डॉ. उत्तम येवले यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. संगीता धिमते, प्रा. अर्चना लबडे व प्रा. प्रणीता जाधव यांनी केले,
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष श्रमसंस्कार शिबीर कालावधीत स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या वतीने फत्याबाद गावात नवमतदार जनजागृती, प्रधानमंत्री जन-धन व विमा योजना, अपारंपरिक उर्जा, नदी स्वच्छता, स्वच्छता व वृक्षारोपण, ऐतिहासिक स्थळे संवर्धन व स्वच्छता अभियान,आर्थिक साक्षरता, अन्न सुरक्षा जनजागृती, बालविवाह विरोधी जनजागृती, हिमोग्लोबीन चेकअप, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती,वृक्षारोपण व संवर्धन, धार्मिक स्थळांची स्वच्छता, डिजीटल साक्षरता, पर्यावरण, जैवविविधता व अधिवास संवर्धन आदी उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम आणि 'खेळ आणि मानसिक आरोग्य'.नितीन वाळुंज 'योगा व प्राणायाम काळाची गरज' संभाजीराजे देवकर), व्यक्तिमत्व विकास' (जालिंदर गागरे), सायबर साक्षरता' (प्रा. संतोष गुजर), 'राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास' (डॉ. रोहिदास भडकवाड), 'हिमोग्लोबीन तपासणी' संतोष उबाळे, 'सौर ऊर्जा काळाची गरज' (प्रा. बाबासाहेब पेहरे), 'स्वावलंबन (डी. उत्तम येवले) या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या उपक्रमांचा ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी लाभघ्यावा असे आवाहान प्राचार्य डॉ. हरीभाऊ आहेर, समन्वयक डी. गोरक्ष बोर्ड, अधीक्षक भाऊसाहेब गटकळ यांनी केले आहे.
