नाशिक दिनकर गायकवाड व्हॉट्सॲप वरून महिलेच्या पतीला अश्लील फोटो पाठवून महिलेचा ऑनलाईन विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही देवळाली कॅम्प येथे राहते. आरोपी कृष्णा पुढेवाड (रा. कात्रज, पुणे) याने फिर्यादी महिलेच्या पतीच्या व्हॉट्सॲपवर पीडितेचे अश्लील व आक्षेपार्ह फोटो प्रसारित करून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला.हा प्रकार नुकताच घडला आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात कृष्णा पुढेवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नाईकवाडे करीत आहेत.
