चंदनेश्वर विद्यालयात तालुकास्तरीय खो खो स्पर्धा उत्साहात

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच तालुका स्तरावरील खो खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्थळवाडी मेंढवण लहान गट मुली खोखो संघाची उत्कृष्ट कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड. या स्पर्धेत तालुक्यातून विविध शाळेतुन स्पर्धक सहभागी झाले होते यावेळी स्पर्धकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेची सुरुवात गटविकास शिक्षणाधिकारी पंचायत समिती संगमनेर बाळासाहेब गुंड यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी मान्यवरांचं स्वागत चंदनेश्वरी विद्यालयाच्या वतीने  करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून.प्रवीण शिनारे गटविकास अधिकारी पं.स. संगमनेर अशोक खेमनर मुख्याध्यापक चंदनेश्वरी विद्यालय उद्घाटनावेळी प्रथम सामना मोठा गट खो खो साकुर विरुद्ध वडगाव लांडगा असा झाला.परंतु लहान गट मुली खोखो कार्थळवाडी मेंढवण संघाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
या छोट्या छोट्या मुलींनी अगदी छोट्याशा शाळेमधून येऊन तालुक्यांमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले संघाच्या उपांती फेरीमध्ये साकुर बीट वरवंडी  विरुद्ध तळेगाव दिघे बीट कार्थळवाडी मेंढवन यांच्या मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली चुरशीच्या सामन्यामध्ये  कार्थळवाडी संघाने वरवंडी संघावर मात देत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.

अंतिम फेरीमध्ये तळेगाव दिघे बीट विरुद्ध धांदरफळ बीट म्हणजेच वडगाव लांडगा शाळा विरुद्ध कार्थळवाडी मेंढवणअशी लढत पाहायला मिळाली यामध्ये कार्थळवाडी संघाने वडगाव लांडगा संघावर सहज मात करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले नाव घोषित केले.

विशेषतः कार्थळवाडी( मेंढवण) हा संघ  लहान वाडी मधून येऊन तालुक्यावर अशी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली याचे सर्वत्र कौतुक होत आहे या शाळेची पटसंख्या अवघी ४० इतकी आहे. परंतु येथील शिक्षक सिताराम पंढरीनाथ दळवी यांनी या मुलांवर विशेष परिश्रम घेऊन इथपर्यंत पोचवले म्हणून शाळा व्यवस्थापन समिती कार्थळवाडी व तळेगाव दिघे बीट कडून शिक्षकांचे विशेष कौतुक केले जात आहे.संघाला पुढील वाटचालीसाठी तालुक्यातून शुभेच्छा दिल्या जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!