धार्मिकतेमुळे विवाहाचे मार्ग खुले होतात-रेव्ह.रमेश साळवी

Cityline Media
0
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी- ख्रिस्ती समाजाने परमेश्वराच्या आधीन राहून कौटुंबिक धार्मिकता जोपासल्यास ईश्वराचे अधिष्ठान प्राप्त होते आणि विवाहाचे मार्ग मोकळे होतात असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड येथील रेस्टोरेश चर्चचे रेव्ह.रमेश साळवी यांनी नुकतेच केले.
संगमनेर तालुक्यातील कोंची येथील दादाभाऊ भोसले या सेवाभावी प्रतिष्ठानने नुकतेच आयोजित केलेल्या पुण्यातल्या १६८ व्या ख्रिस्ती वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाट्न रेव्ह. साळवी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. 

प्रसंगी ख्रिस्ती नवनिर्माण सेवेचे अध्यक्ष दिपक चक्रनारायण यांनी संयोजकांच्या सेवाकार्याचा गौरव करून उपस्थितांना विवाह जुळवताना तडजोड करण्यासंबंधी अवाहन केले.श्रीरामपूरचे ॲड.श्री.सिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले कि,जुजबी कारणावरून टोकाची भूमिका न घेता कुटुंबातले वाद कुटूंबातच मिटवावेत आणि परिवारात गुण्यागोविंदाने रहावे.
या सेवाभावी उपक्रमास रेस्टोरेशन सेंटरचे(चर्च) सचिव दिलीप गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी पुण्यासह कल्याण, अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर आदी ठिकाणाहुन आलेल्यांची उपस्थिती १२५ हुन अधिक होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉमनिक कदम यांनी केले.

सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू चंदनशीव, स्यामुएल जाधव,समीर आंग्रे आदिनी मोलाचे परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!