गव्हाण स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी राजदिप कदम यास लोयोला सदन तर्फे बक्षीस वितरण

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील लोयोला सदन चर्चमध्ये उपक्रम म्हणून दरवर्षी नाताळ सणाच्या निमित्ताने "बाळ येशूचा जन्माचा देखावा" हा गव्हाण स्पर्धचा एक भाग असतो.यामध्ये शहरी व ग्रामीण असे दोन केले जातात.श्रीरामपूर शहरी भागात प्रथम क्रमांक राजदिप दिपक कदम यांने मिळविला.
यावेळी राजदिप कदम या बालकाने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल लोयोला चर्च धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव व रे.फा.सुनिल गायकवाड यांच्या हस्ते राजदिप यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या सत्कार समयी कमलाकर पंडीत,विजय त्रिभुवन, लता बनसोडे, लाजरस गायकवाड ,मंगल दुशिंग,लेविन भोसले,राजू साळवे,जेम्स पंडीत,सूरेश ठुबे,हान्स स्टाफनर प्रतिष्ठान, कानोसा सिस्टर्स, संत लुक सिस्टसर्स, लोयोला युथ ग्रुप व सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल राजदिप कदम याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!