जन्मदिनी शालेय साहित्य भेट घेत गरजू मुलांना देण्याची संकल्पना रुजणे गरजेचे -आप्पासाहेब ढूस

Cityline Media
0
प्रसादनगरच्या जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

देवळाली प्रवरा प्रतिनिधी आपल्या जन्मदिनी भेट स्वरूपात हार बुके स्विकारण्यापेक्षा वही पेण घेऊन गरजू मुलांना देण्याची संकल्पना रुजणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी केले.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील प्रसादनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांनी त्यांच्या जन्मदिनी भेट स्वरूपात स्वीकारलेले शालेय साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना ढूस बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष ललित चोरडिया हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये मा. उपाध्यक्ष आप्पासाहेब कोहकडे, शिवसेनेचे विजय गव्हाणे ,प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला शहर अध्यक्षा सौ.रजनी कांबळे, शहर संपर्क प्रमुख गणेश भालके,चैतन्य आल्हाट, सनी जगताप सत्यवान कौसे, विकी जगताप, रामभाऊ राजळे , नितीन पुंड, बबन निमसे,विजू जाधव, चैतन्य आल्हाट, आसाराम आल्हाट,चिंतामण कांबळे, सचिन कांबळे, सलीम भाई शेख,रजनी पांडे,कृष्णा जगताप, शाळेचे मुख्याध्यापक श्री.खंडागळे, श्री.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी पुढे बोलताना ढूस म्हणाले की, दोन पाच हजार रुपयांचे शालेय साहित्य वह्या वाटप करून आपल्याला कोणती प्रसिद्धी मिळवायची नाही,तर अश्या पद्धतीने जन्मदिनी हार तुरे स्वीकारण्या ऐवजी शालेय साहित्य स्वीकारून ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्यास एका बुकेच्या खर्चामध्ये एका विद्यार्थ्याला वर्षभराच्या वह्या मिळू शकतात. ही संकल्पना समाजामध्ये रुजणे गरजेचे आहे व हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याने असा कार्यक्रम आपण करत आहोत.

प्रसंगी ललित चोरडिया,आप्पासाहेब कोहकडे, जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.. प्रास्ताविक शिक्षक श्री.शिंदे आभार शिक्षक श्री.खंडागळे यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!