घराबाहेर पडलेल्या एका मुलींसह मुलाचे अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहरातील अंबड व नाशिकरोड परिसरातून अज्ञात इसमाने एका मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी यांची मुलगी मैत्रिणीकडे जाते, असे सांगून घराबाहेर गेली होती.ही मुलगी बराच वेळ होऊनही घरी आली नाही. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी महिला ही सौभाग्यनगर परिसरात राहते. ही महिला मजुरीचे काम आटोपून सायंकाळी घरी आली असता त्यांचा मुलगा घरात दिसून आला नाही. या मुलाचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र हा मुलगा मिळून आला नाही. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!