पत्नी तक्रार मागे घेत नसल्याने पाजले फिनाईल;पती विरुद्ध गुन्हा दाखल

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पत्नीला बळजबरीने फिनाईल पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              छाया रेखांकन-प्रकाश कदम 
घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,की फिर्यादी व आरोपी हे नात्याने पती-पत्नी आहेत.फिर्यादी महिलेला तिचे पती मानसिक व शारीरिक छळ करून त्रास देत असल्याने पती विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात पत्नीने तक्रार दिली आहे.

आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला त्यांच्या घराजवळ बोलावले.त्यानंतर खोत मळा येथील एका घरात घेऊन जाऊन पतीने तक्रार मागे घेतली नाही, तर पत्नीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली,तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बाथरूम साफ करण्याचे फिनाईल बळजबरीने पाजून पत्नीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!