नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी सुफी जीन यांची निवड करण्यात आली आहे,अशी माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड यांनी दिली.
छाजेड यांनी सुफी जीन यांच्या गटनेतेपदी निवडीसाठी ठराव मांडला.या ठरावाला खा.डॉ.शोभा बच्छाव, नगरसेविका सामिया खान,नगरसेविका नाझिया अत्तार तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद आहेर उपस्थित होते.बैठकी दरम्यान जावेद इब्राहिम व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
