नाशिक दिनकर गायकवाड खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी ज्वेलर्स शोरूममधून सोन्याचे टॉप्स चोरून नेल्याची घटना उंटवाडी येथे नुकतीच घडली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
फिर्यादी नितेश अशोक सोनवणे (रा. पाटीलनगर, सिडको) हे उंटवाडी येथे असलेल्या कांकरिया ज्वेलर्सचे काम पाहतात. या शोरूममध्ये नुकतेच दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिला आल्या.त्या टॉप्स खरेदी करीत होत्या.या महिलांनी सेल्समनची नजर चुकवून ६.५१० ग्रॅम वजनाचे ९९ हजार ७३० रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून चोरून नेले.
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार महाजन करीत आहेत.
