नाशिक दिनकर गायकवाड मैत्रिणीसोबत बाहेर फिरण्यासाठी जाते,असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना सिडकोत घडली.
फिर्यादी यांची लहान मुलगी मैत्रिणीसोबत बाहेर फिरण्यासाठी जाते,असे सांगून घरातून निघून गेली; परंतु बराच वेळ होऊनही ही मुलगी घरी परतली नाही.म्हणून तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती मिळून आली नाही.या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेत तिचे सावतानगर येथे अपहरण केल्याची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंदे करीत आहेत.
