साकूर गट आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत वरवंडी जि. प. शाळा अव्वल

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा साकुर बीटाच्या क्रीडा स्पर्धा नुकत्याच पिंपळगाव देपा येथील हनुमान विद्यालात पार पडल्या.
परिसरातील सर्व वरवंडी,साकुर,मांडवे बु,हिवरगाव पठार,केंद्रातील प्रथम क्रमांक प्राप्त शाळांनी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य होते.

 स्पर्धेत जि.प.शाळा वरवंडी लहान गट मुली पहिल्या फेरीत खंडेराय वाडी येथील मुलींना ५ गुणांनी पराभुत केले व अंतिम सामन्यात जांबुत येथील  मुलींना अटीतटीच्या सामन्यात एक मिनिट शिल्लक ठेऊन दणदणीत विजयी झाल्या.आता पुढील सामना तालुका स्तरावर खेळला जाणार आहे.
 स्पर्धेत विवेक संपत भोसले लहान गट उंच उडी द्वितीय क्रमांक व आराध्या लक्षमण गागरे ५० मी.धावणे तृतीय क्रमांक आला असून सर्व विजयी स्पर्धक,शिक्षक वृंद,व पालक यांचे साकूर बीटाकडून अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!