दोन दशकानंतर शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया प्रकरणी बिनशर्त माफीनामा

Cityline Media
0
ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसकडून कार्यवाही

सातारा, सिटीलाईन न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'शिवाजी द हिंद किंग इन इस्लामिक इंडिया' या वादग्रस्त पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणाप्रकरणी तब्बल दोन दशकांनंतर ऑक्स्फर्ड प्रेस व अन्य संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात बिनशर्त माफी मागितली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने नुकतेच ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने एका इंग्रजी वृत्तपत्रात जाहीर माफीनामा प्रसिद्ध केला आहे.दोन दशकांच्या न्यायालयीन लढ्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांना यामुळे यश मिळाले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २००३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित केले होते. जेम्स लेन हा अमेरिकन इतिहास अभ्यासक या पुस्तकाचा लेखक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास मांडताना या पुस्तकातील ३१, ३३, ३४ व ९३ व्या पानावर संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या राजमाता जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर छापला होता. यावरून महाराष्ट्रासह देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पुण्यात असंतोषाची धग जास्त होती. कारण या प्रकरणात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्रातील काही इतिहासतज्ज्ञांनी लेन

असा आहे माफीनामा
जेम्स विल्यम लेन यांनी लिहिलेले पुस्तक २००३ मध्ये ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटीने प्रकाशित केले. लक्षावधी लोकांच्या मनामध्ये आणि हृदयावर राज्य करणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची लोकप्रियता मी ओळखतो. त्यांच्या विषयीच्या मनोभावना, त्यांचा वारसा याबाबत मी आदर व्यक्त करतो. उदयनराजे भोसले तसेच जनतेच्या भावना दुखावल्या असतील, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना झालेल्या मनस्तापाबद्दल मी हा बिनशर्त माफीनामा उदयनराजे भोसले यांच्याकडे सादर करतो.

याजी जेम्स लेन लिखित, 'शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' या महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करण्याचा मजकूर लिहिला होता. त्याविरोधात आम्ही सातारा येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खासगी फौजदारी खटला दाखल केला आहे. हा खटला काढून टाकावा, याकरिता संबंधितांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान संशयितांनी माफी मागण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश दिघे यांचा आदेश पारित झाला असून, संशयितांनी माफीनामा लिहून दिला आहे.

- उदयनराजे भोसले, खासदार

यांना माहिती पुरविल्याचा आरोप झाला होता. त्यातून पुण्यातील या संस्थेवर पाच जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. नंतर तत्कालीन राज्य सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती. पुढे लेखक आणि प्रकाशकांनी आक्षेपार्ह मजकूर वगळण्याचे व माफी मागण्याचे आश्वासन दिल्यानंतर २००७मध्ये या पुस्तकावरील बंदी उठवली.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रकरणी (कै.) अॅड. धैर्यशील पाटील यांच्यामार्फत सातारा येथील न्यायालयात लेखक जेम्स लेन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचे माजी कार्यकारी संचालक सईद मंझर खान तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील संस्कृतचे प्राध्यापक

डॉ. श्रीकांत बहुलकर, प्राध्यापक सुचेता परांजपे, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन केंद्राचे ग्रंथपाल वा.ल. मंजूळ यांच्यासह दहा जणांवर फौजदारी दावा दाखल केला होता. या खटल्यामध्ये संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. हा फौजदारी खटला चालवू नये, काढून टाकावा याकरिता चौघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गेली ११ वर्षे उच्च न्यायालयात हा लढा सुरू होता; परंतु १७ डिसेंबर २०२५ ला झालेल्या सुनावणीमध्ये त्यांनी उच्च न्यायालयात या आक्षेपार्ह लिखाणाबाबत उदयनराजेंची माफी मागायची तयारी दर्शवली, तसेच त्या लेखी माफीपत्राची मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात व्यापक प्रसिद्धी देऊ, असे म्हटले होते. त्यानुसार ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने आज एका वृत्तपत्रात जाहीर माफी मागितली.

उदयनराजे भोसले यांनी २००४ मध्ये सातारा न्यायालयात याबाबतचा मूळ फौजदारी खटला दाखल केला होता. या खटल्यातील पुढील टप्प्यातील उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनुसार आज एका वृत्तपत्रात माफीनामा आला आहे, तसेच उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला आहे;परंतु मूळ खटल्याची सुनावणी सातारा न्यायालयात १३ जानेवारीला होणार असल्याची माहिती ॲड.ताहिर मणेर यांनी दिली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!