नाशिक मध्ये विविध ठिकाणी दोन मुलींचे अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील बोरगड व अंबड परिसरातील दोन मुलींना अज्ञात इसमांनी कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
अपहरणाचा पहिला प्रकार बोरगड येथे घडला. फिर्यादी महिला नुकतीच साडेबारा वाजेच्या सुमारास पती व सासरे यांच्यासोबत पेठ रोडवरील नामको हॉस्पिटल येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची मुलगी ही घरी एकटीच होती.त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. फिर्यादी घरी परतल्यानंतर ही बाब लक्षात आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी यांची मुलगी घरी होती. आरोपी पंकज रमेश रार (वय २७, रा. त्रिमूर्ती चौक, अंबड, मूळ रा. उत्तर प्रदेश) हा फिर्यादीच्या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन जात होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला अडवून मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पंकज रार याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!