शहराला सोळा पेक्षा अधिक रस्त्यांनी जोडणारे द्वारका सर्कल पुढील तीन महिने बंद

Cityline Media
0
ग्रेड सेप्रेटरची निर्मिती सुरु;आजपासून वाहतुकीत मोठे फेरबदल

नाशिक दिनकर गायकवाड शहराला सोळापेक्षा अधिक रस्त्यांनी जोडणाऱ्या द्वारका सिग्नलवर पुढील तीन महिने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.ग्रेड सेप्रेटरच्या निर्मितीसाठी संपूर्ण शहरातील वाहतूक इतर मार्गावरुन वळविण्यात आली आहे. यासह एसटी बस,सिटी लिंकसह खासगी बस स्थानकांतही बदल केले आहेत.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर द्वारका सिग्नल येथे ग्रेड सेप्रेटर तयार करण्यात येत आहे.द्वारका सिग्नल जवळ सात उप रस्ते आणि चार प्रमुख रस्ते एकत्रित येतात.तेथील कामकाजामुळे वाहतूक सुव्यवस्थेसाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अतिरिक्त कार्यभार संदीप मिटके यांनी अधिसूचना जारी केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः या ठिकाणची पाहणी करुन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला होता. नुकतेच पुन्हा उपायुक्त मिटके, सहाय्यक आयुक्त अद्विता शिंदे यांच्यासह पथकांनी फेरपाहणी करुन सर्वेक्षणाअंती मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले.

हाइट बॅरिअर पॉइंट काठेगल्ली,वडाळा नाका,फेम सिङ्गल,ट्रॅक्टर हाउस,सारडा सर्कल

उड्डाण‌ पुलावरील द्वारका येथील धुळे बाजूकडील डाउन रॅम्प

उड्डाणपुलावरील द्वारका येथील मुंबई बाजूकडील डाउन रॅम्प

अवजड वाहनांना पर्याय... (रात्री १० ते सकाळी ८)

मुंबईकडे जाण्यासाठी: सिन्नर फाटा-दत्तमंदिर सिग्नल-फेम

सिग्नलकडून डावीकडे वळून स्वीशंकर मागनि आठवण हॉटेल वडाळा गाव सर्कल-साईनाथ चौफुली-कलानगर सिग्नल पाथर्डी गाव-पाथर्डी
फाटा-गरवारे पॉइंटमार्गे मुंबईकडे मार्गस्थ
सिन्नरकडे जाण्यासाठी: पाथर्डी फाटा-पाथर्डी गाव-कलानगर सिप्रल-साईनाथ चौफुली-वडाळागाव-रहमतनगर-देवरे पेट्रोल पंप-फेम सिग्नलमार्गे पुणे महामार्गावरुन मार्गस्थ

नेमकं काय होणार ?
सारडा सर्कल ते काठेगल्ली या रस्त्यावर ८०० मीटर लांबीचे 'ग्रेड सेप्रेटर'
वडाळा नाका सिग्नलपासून ट्रॅक्टर हाउसकडे ३०० मीटर लांबीचे 'ग्रेड सेप्रेटर'

सध्या द्वारका परिसरात असलेले भूयारी रस्ते काढण्यात येणार

'ग्रेड-सेप्रेटर' मधून दुतर्फा वाहतूक होणार
नाशिकरोड, आडगाव, पुणे व धुळेकडे जाणाऱ्या वाहनांना 'ग्रेड सेप्रेटर' वापरता येईल
३० जानेवारी ते २९ एप्रिल २०२६ पर्यंत अधिसूचना लागू
अधिसूचनेत आवश्यकतेनुसार बदल, सुधारणा

सर्व अवजड वाहने, खासगी प्रवाशी बसेस, एसटी बसेस, सिटी लिंक बसेस यांना शहरात प्रवेश बंद

सर्व प्रकारची अवजड वाहने व खासगी बसेस पर्यायी मार्गावरुन फक्त रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत मार्गस्थ होतील

फक्त सिटी लिंक व एसटी बसेसला दिवसभर पर्यायी मार्गावरुन प्रवासाची परवानगी

निमाणी एसटी बस डेपोतून धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, दिंडोरी, पेठ, वणी, कळवण, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सुरगाणा येथे जाण्यासाठी बसेस मार्गस्थ होतील

निमाणी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व सिटी लिक बसेस या तपोवन सिटी लिंक बस टर्मिनल्स येथून मार्गस्थ होतील

हाइट बेरिअर पॉइंट येथून एकही मोठे वाहन मार्गस्थ होणार नाही. गरजेनुसार हलक्या वाहनांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते

सिटी लिंक बसेसकरीता...

शालिमार ते नाशिकरोड शालिमार खडकाळी सिग्नल-सारडा सर्कल-नॅशनल उर्दू हायस्कूल मदिना चौक-वडाळा नाका-सह्याद्री सिग्रल-अशोका सिग्रल-फेम सिवालमार्गे इतरत्र. तसेच नाशिकरोडवरुन फेम सिग्नल-अशोका मार्ग-भारतनगर वडाळा नाका-मुंबई नाका-सारडा सर्कल-शालिमारमार्गे इतरत्र.

हलक्या वाहनांसाठी पर्याय.

पुण्याकडून मुंबईकडे सिन्नर फाटा रेल्वे क्रॉसिंग-बागूलनगर-विहितगाव सिग्नल वडनेर रोड-पाथर्डी गाव पाथर्डी फाटा-गरवारेमार्गे मुंबईकडे

पुण्याकडून त्र्यंबकेश्वर सिन्नर फाटा रेल्वे क्रॉसिंग-बागूलनगर-विहितगाव सिग्रल-पाथर्डी गाव अंबड गाव-एक्स्लो पॉइंटमार्गे त्र्यंबकेश्वरकडे

मुंबई नाक्याकडून नाशिकरोड मुंबई नाका भाभानगर-काठेगल्ली सिग्नल-पुणे महामार्गावरुन नाशिकरोडकडे.

नाशिकरोडहून पंचवटीकडे फेम सिग्नल मेट्रो मॉल जंक्शन-ट्रॅक्टर हाउसमार्गे पंचवटीकडे.

खासगी बसेस, अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेश नाही.

नियमांचे तंतोतंत पालन करणे बाहन मालक व चालकांना बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणान्यांवर मोटार वाहन अधिनियमांतर्गत कायदेशीर कारवाई होईल.

- संदीप मिटके, वाहतूक पोलिस उपायुक्त (अतिरिक्त कार्यभार)

एसटी बसेसला पर्याय.

नाशिकरोडहून मुंबईकडे सिन्नर फाटा-दत्त मंदिर सिग्रल-सम्राट सिग्रलकडून संत सावता माळी मागनि म्हाडा कॉलनी-कलानगर सिग्रल-लेखानगर चौकातून सव्र्हिसरोडवरुन मुंबई नाका सर्कल व महामार्ग बस स्थानकातून पुन्हा मुंबई नाका सर्कलवरुन इंदिरानगर जॉगिंग ट्रैकसमोरुन पाथर्डी फाटामार्गे मुंबईकडे मार्गस्व.

सिन्नरकडे जाण्यासाठी : महामार्ग बस स्थानक मुंबई नाका-इंदिरानगर बोगद्यासमोरुन साईनाथ चौफुली वडाळा गाव-रहमतनगर-संगठा कॅसल-डीजीपीनगर-सम्राट चौफुलीवरुन पुणे महामार्गावरुन मार्गस्थ.

पुणेकडून नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे सिन्नर फाटा-सम्राट सिग्नल-डीजीपी नगर-वडाळा गाव-कलानगर सिअल लेखानगर चौफुली-गोविंदनगर-उंटवाडीरोड भवानी सर्कल-जलतरण तलाव सिग्रलमार्गे ठकर बाजारपर्यंत.

नाशिकहून पुण्याकडे : ठक्कर बाजार स्थानक मोडक सिग्रल-गडकरी सिग्रल-मुंबई नाका-इंदिरानगर बोगद्यासमोरुन साईनाथ चौफुली-फेम स्सिसाल-नाशिकरोड-सिन्नर फाटामार्गे मार्गस्थ,

मुंबईकडून नाशिकमार्गे धुळे: गरवारे टी पॉइंट उड्डाणपुलावरुन-इंदिरानगर बोगद्याजवळ उतरुन गोविंदनगर-सिटी सेंटर मॉल सिग्रल-एबीबी सिग्नल-महात्मानगर जेहान सर्कल हुतात्मा चौक-जुना गंगापूर नाका-चोपडा लॉन्स ड्रीम कैंसल सिग्नल-मखमलाबाद टी पॉइंट बाजार समिती सिग्नल-तारवाला सिग्नल दिंडोरी नाकामार्गे निमाणी बस स्थानकापर्यंत येतील. तेथून निमाणी बस स्थानक-काट्था मारुती सिग्रल-संतोष टी पॉइंटवरुन अमृतधाम चौकातून रासबिहारीमार्गे धुळ्याकडे जातील.

पुण्याकडून धुळे-मालेगाव-गुजरात-पेठ दिंडोरीकडे : सिन्नर फाटा-बिटको चौक-जेलरोडमार्गे नांदूरनाका मिरची सिग्नल-स्वामी नारायण चौक-काट्या मारुती सिग्नलमार्गे इतरत्र, यासह पुण्याकडे जाण्यासाठी काट्या मारुती सिग्नल-स्वामी नारायण चौकातून नांदूरनाका-जेलरोडमार्गे जातील.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!