पत्रकार दिनानिमित्त नाशिक पोलिसांनी केला पत्रकारांचा सत्कार

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रभर विविध ठिकाणी कार्यक्रम, चर्चासत्रे आणि सन्मान समारंभांचे आयोजन करून पत्रकारितेच्या आदर्श परंपरेला उजाळा दिला जातो.६ जानेवारीचा हा दिवस पत्रकारांसाठी केवळ गौरवाचा नसून,समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव असते.नुकतेच नाशिक येथे शहरातील सर्व पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गुलाब पुष्प आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसंगी नाशिक शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते पोलिसांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत सर्वांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
व पोलिस आणि पत्रकार हे दोघेही कायदा रक्षकच आहे, दोघांनी संविधानाच्या चौकटीत राहूनच कृतिशील राहावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
प्रसंगी परिमंडल २ पोलिस उपआयुक्त  किशोर काळे. नाशिक रोडचे सहा.पोलीस आयुक्त विभाग श्रीमती. संगिता निकम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक श्री.बढे नाईकवाडे 
गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक,प्रविण सूर्यवंशी यांच्या उपस्थित पत्रकार दिनाच्या निमित्ताने गुलाब पुष्प पेन देऊन सर्व पत्रकारांचे सत्कार करण्यात आला आणि पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!