दारूच्या नशेत पत्नीचा खून केला;किटकनाशके पिऊन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

Cityline Media
0


नाशिक दिनकर गायकवाड कळवण तालुक्यातील साकोरेपाडा येथे उपसरपंचाने दारूच्या नशेत आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची गंभीर घटना नुकतीच मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
              छाया रेखांकन-प्रकाश कदम 
प्राथमिक माहितीनुसार साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारू पवार (वय ६५) व त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार (वय ६०) यांच्यात पतीच्या मद्य सेवनामुळे वारंवार वाद होत होते.नेहमीप्रमाणे मध्यरात्रीच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

त्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार यांनी झोपेत असलेल्या पत्नी जिजाबाई यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला.खून केल्यानंतर आरोपी जयराम पवार याने घरात शेतीसाठी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे व हवालदार शेवाळे करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!