लोणी ज्ञानेश्वर साबळे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत श्री नरहरी महाराज यांच्या ७४० व्या पुण्यतिथी निमित्त नुकतेच संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी संत श्री नरहरी महाराज यांची आरती करण्यात आली, या प्रसंगी आश्वी सुवर्णकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी ह .भ.प बाळासाहेब उंबरकर महाराज यांचे संगितमय प्रवचन झाले तसेच पुण्यतिथी निमित्त सुवर्णकार समाजाचे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे रवि माळवे व रामभाऊ शेवंते उपस्थित होते.
आश्वी सुवर्णकार समाजाची एकजूट व नेहमी उत्तम नियोजन असते असे मनोगत रवि माळवे यांनी व्यक्त केले, आश्वी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मैड, व सचिन मैड तसेच पुण्यतिथि निमित्त सुवर्णकार समाजाचे अनेक समाज बांधव व भगिनी यांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी महा प्रसाद,किशोर उदावंत, व सागर कुलथे यांच्याकडून महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते.
