नाशिक दिनकर गायकवाड भरधाव रिक्षा चालकाच्या धडकेत दुचाकी वरील मायलेक जखमी झाल्याची घटना सातपूरला घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी रोहित रतन आहेर (रा. अशोकनगर, सातपूर) हे त्यांची आई अर्चना आहेर यांना एमएच १ ५ एचएन ६६२७ या क्रमांकाच्या मोटार सायकलीने सातपूर एमआयडीसी येथे सोडण्यासाठी अशोकनगरकडून सकाळ सर्कलमार्गे जात होत्या.
त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ ईएच ३२६६ वरील चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादी रोहित आहेर व त्यांची आई अर्चना आहेर या दोघा जणांना दुखापत झाली असून, दुचाकीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत. रिक्षा चालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
