नाशिक दिनकर गायकवाड बांधकामाच्या साईटवरून लोखंडी जॅक,सेंटरिंग प्लेट, लोखंडी चॅनल असे सुमारे १ लाख ६८ हजार रुपयांचे साहित्य चोरून नेल्याची घटना म्हसरूळ येथे घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की महेश ज्ञानेश्वर महाजन (रा. योगेश्वर संकुल, खुटवडनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की म्हसरूळ येथील निसर्गनगरमध्ये लक्ष्मी कन्स्ट्रक्शन्सच्या नावाने बांधकाम साईट सुरू आहे. या ठिकाणी असलेले १ लाख रुपये
किमतीचे १७ नग लोखंडी जॅक, ४८ हजार रुपये किमतीच्या ४० नग लोखंडी सेंटरिंग प्लेट व २० हजार रुपये किमतीचे पाच नग लोखंडी चॅनल असे एकूण १ लाख ६८ हजार रुपये किमतीचे बांधकामासाठी लागणारे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेले.या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
