नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहर परिसरात वाहन चोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहनचोरीचा पहिला प्रकार बोरगड येथे घडला. फिर्यादी सागर सोमनाथ कहाणे (रा. पुष्पकनगर, बोरगड) यांनी राहत्या घराजवळ एमएच ०१ एडब्ल्यू ४३२७ या क्रमांकाची १५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वसावे करीत आहेत. वाहनचोरीचा दुसरा प्रकार टाकळी येथे घडला.
फिर्यादी नीलेश अशोक देवळे (रा. श्रीरामकुंज सोसायटी, टाकळी रोड, काठे गल्ली) यांनी टाकळी येथे चिस्तिया ट्रान्स्पोर्टजवळ एमएच ०५ एसआर ३२०९ या क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची यामाहा मोटारसायकल उभी केली होती. ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
वाहनचोरीचा तिसरा प्रकार सातपूर येथे घडला. फिर्यादी प्रदीप जयवंत हिरे (रा. खांदवेनगर, सातपूर) यांनी एमएच १५ डीएक्स २५८९ या क्रमांकाची २५ हजार रुपये किमतीची होंडाशाईन सीबी मोटारसायकलव उभी केली होती. ही मोटारसायकल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
