शिंदे गावच्या हॉटेल वृंदावन मध्ये मुलीचे फोटो काढण्यावरुन ‌दोघांना मारहाण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मुलीचे फोटो काढल्याच्या कारणावरून दोन युवकांना बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन व मोबाईल बळजबरीने काढून घेतल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                     छाया रेखांकन-प्रकाश कदम 
फिर्यादी यश अनिल गायके (रा. नाशिकरोड) व त्यांचे मित्र स्वप्नील धात्रक यांना मुलीचे फोटो काढल्याच्या कारणावरून आरोपी मंगेश खलसे, दीपक राक्षे, किरण राक्षे व त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने फिर्यादी व त्याच्या मित्राला फायटर, लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या झटापटीमध्ये फियांदीच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १५ हजार रुपये किमतीची सोन्याची राजमुद्रा व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला.

हा प्रकार शिंदे गाव येथील वृंदावन हॉटेलमध्ये घडला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!