पुण्यात स्टारफेअर्स सौंदर्य स्पर्धा उत्साहात

Cityline Media
0
किताबाच्या मिसेस स्नेहा अक्षय परदेशी व भोसरी मधील मिस शर्वरी विशाल कांबळे  मानकरी

पुणे प्रशांत निकम स्टारफेअर्स इव्हेंटस यांच्यातर्फे आयोजित ‘मिसेस प्राइड ऑफ इंडिया २०२६ आणि ' मिस प्राइड ऑफ इंडिया २०२६'या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेचा किताब नुकतेच पेठ येथील मिसेस स्नेहा अक्षय परदेशी  व भोसरी मधील  मिस शर्वरी विशाल कांबळे यांनी आपल्या सौंदर्य,आत्मविश्वास व प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर पटकावला.
स्टारफेअर्स इव्हेंटस पुणे यांच्या वतीने सिंहगड रोड येथील श्री गणेश बँक्वेट हॉल मध्ये नुकतीच ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचे आयोजन स्टारफेअर्स इव्हेंटसच्या पल्लवी मोरे-माने यांनी केले होते.या स्पर्धेचा क्राउनिंग सोहळा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आफताब शिवदासानी यांच्या हस्ते पार पडला .तसेच  'लग्नाचा शॉट या मराठी चित्रपटाची  संपूर्ण टीमसोबत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यावेळी उपस्थित होत्या.

प्रसंगी  विविध क्षेत्रातील मान्यवर ,दिग्दर्शक उपस्थित होते.यावेळी प्रसिध्द फॅशन ग्रुमर अनिल पाचंगे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या सौंदर्य स्पर्धेचे अभिनेते चेतन चावडा,अरुण शर्मा, फॅशन मॉडेल सारा मोतीवाला,रूपाली ढेकेकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

यावेळी  मॉडेल्सने आकर्षक असा पेहराव करून उपस्थित प्रेक्षकांसमोर रॅम्प वॉक केले. पारंपारिक व वेस्टर्न पोशाखांमधील मॉडेल्सनी रॅम्प वॉक  मध्ये सहभाग घेतला.या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा भरवण्यासाठी पल्लवी मोरे - माने याचे  कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!