लोणीत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७४० वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात

Cityline Media
0
लोणी ज्ञानेश्वर साबळे राहाता तालुक्यातील लोणी येथे संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७४० वा पुण्यतिथी सोहळा २९ वे वर्ष भक्तिभावात व जल्लोषात साजरा करण्यात आला.
या पवित्र सोहळ्यामध्ये संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.समाज बांधव ,भाविक भक्त व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी अकरा वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व महापूजा करण्यात आली.  ही पूजा समाज बांधव अर्जुन भगीरथ टाक  या दाम्पत्याच्या हस्ते पार पडली.

मंत्रोच्चारभक्तिगीते व आरतीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.यावेळी दुपारी चार वाजता भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात युवानेते डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवासापासून सराफ बाजार ते नरहरी महाराज मंदिर अशी काढण्यात आली होती.

या मिरवणुकीसाठी समाज बांधव ग्रामस्थ तसेच वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीत महाराजांच्या प्रतिमेसह वारकरी मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोष सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर ज्ञानदेव तुकाराम, संत नरहरी महाराज की जय घोषणांनी दुमदुमून गेला होता.

मिरवणुकी दरम्यान सामाजिक बांधिलकी जपत  समाज बांधवांसाठी पाणी बाटलीचे आयोजन योगेश नरसिंगपूर यांच्याकडून करण्यात आले होते.या उपक्रमाचे उपस्थितानी विशेष कौतुक केले.याप्रसंगी ह भ प हर्षद महाराज भागवत,राम मैड सरपंच श्रीमती कल्पना मैड,गणेश सोपान मैड, विखे काका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंगळवार रोजी रांगोळी ,नृत्य बूगी बूगी, लिंबू चमचा असे विविध स्पर्धेचे आयोजन केले होते त्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
त्यानंतर ह. भ प.हर्षद महाराज भागवत महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

समाजाच्या वतीने  विविध समाज बांधवांनी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले समाजाबद्दल त्यांची असलेली भावना हीच त्यांची पावती आहे असेच सहकार्य पुढे लाभावे अशी भावना व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर महाप्रसादास सुरुवात झाली.शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ भाविक व समाज बांधवांनी घेतला.
हा भव्य पुण्यतिथी महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तसेच पुण्यतिथी महोत्सव समितीचे  सदस्य ,युवा कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रसंगी मोलाचे कार्य केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!