एकलव्य जयंतीचे औचित्य साधत कृतीच्या रिंगणात बेधडक उतरणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान
संगमनेर प्नतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर सोनवणे त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका सौ.रंजना सोनवणे यांचा संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे एकलव्य जयंतीचे औचित्य साधून आंबेडकर नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर व मुलनिवासी नायक एकलव्यांना अभिवादन करून सर्व जोर्वे ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचा अभिमान असलेले नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुधाकर सोनवणे व सुविद्य पत्नी सौ रंजना सोनवणे यांचा सत्कार जिल्हा परिषद
जोर्वे गटाचे इच्छुक उमेदवार नेते शरद नाना थोरात,आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते पॅंथर माणिक यादव, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, अमृतवाहिनी बँकेचे संचालक संजय थोरात, शिर्डी
विधानसभा काँग्रेसचे नेते सुरेश थोरात, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव, जोर्वे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे, जोर्वे विकास सोसायटीचे माजी उपाध्यक्ष ज्ञानदेव थोरात, सामाजिक कार्यकर्ते संदीप यादव, शिक्षक रामदास काकड, एकलव्य जयंतीची समितीचे अध्यक्ष महेंद्र माळी,
शिक्षक सत्यजित थोरात,बबन खैरे, भास्कर बर्डे, अमित थोरात,रवींद्र गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, यांच्या हस्ते झाला प्रसंगी मोठ्या संख्येने जोर्वे गावचे ग्रामस्थ व महिला भगिनी,आदिवासी बांधव आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
