वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील पठारावरील वरवंडी येथे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जय्यत तयारी सुरू असून मोठ्या उत्साहात येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे या जयंती निमित्ताने सर्वानी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी यांच्या संयुक्त शिवजयंती जयंती होणार आहे यावेळी वरवंडी गावातील सुसंस्कृत युवकांनी अनोखा उपक्रम राबवला तो म्हणजे मिरवणुकीत डिजेचा गोंगाट न करता ते पैसे महाराजांच्या विचारांना शोभेल अशी जयंती साजरी करावीत म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी केंद्र शाळा यांना सहभागी करत थेट वार्षिक स्नेहसंमेलन तेही अगदी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यां प्रमाणे हेतू एकच मराठी वाचवा मराठी माध्यमाकडे पालकांचा कल वाढला पाहिजे यासाठी हा प्रयत्न येथील युवकांनी केला आहे.
यात शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शेळके हे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांची मदत करत आहे. नक्की यावर्षी मागील काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे
आजच्या तरुणांना आकर्षित करणारी शिवजयंती उत्साहात साजरी होणार आहे.
