नाशिक दिनकर गायकवाड सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच बालआनंद मेळावा व महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडले.
यावेळी खंबाळे गावच्या उपसरपंच श्रीमती.जिजाबाई आंधळे,सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.नाईक पोलीस पाटील भारत बोऱ्हाडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप खाडे व सदस्य,गावातील इतर मान्यवर,तसेच अनेक पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या खाद्य पदार्थांचे,शेतातील भाजीपाला,तसेच मनोरंजन खेळ यांसारख्या विविध स्टॉलला ग्रामस्थांनी व पालकांनी भेट दिली.भाजीपाला व इतर पदार्थाची खरेदी केली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.यावेळी माता पालक व महिला शिक्षिका यांचा हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा पार पडली व विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
