नाशिक दिनकर गायकवाड रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
मनीषा सुकदेव जुद्रे (वय ३२, रा. लोहशिंगवे, देवळाली कॅम्प) ही तरुणी पाणी आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडत होती. त्यावेळी पोल नंबर १७१/२५ या ठिकाणी भरधाव आलेल्या रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने डोक्याला गंभीर मार लागला. या प्रकरणी शांताराम वाळू जुद्रे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.
