ऑक्सिजन टाक्यांवर दुसऱ्या कंपनीचे स्टीकर चिकटवून चोरी

Cityline Media
0
 गुन्हा दाखल; तपास सुरू

 नाशिक दिनकर गायकवाड कंपनीच्या आवारात ठेवलेल्या ६ ऑक्सिजन सिलिंडरच्या टाक्या चोरून त्यावर दुसऱ्या कंपनीचे स्टीकर लावून वापरल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की अमोल रंगनाथ जाधव (रा. चेतनानगर,राणेनगर) यांची अंबड एमआयडीसीमध्ये पिनॅकल इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात ठेवलेल्या ११ लाख ५० हजार २०० रुपये किमतीच्या २०० लिटर कपॅसिटी असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या सहा टाक्या होत्या.

या टाक्या विल्होळी येथील आरोपी पुष्पक इंडस्ट्रीज या कंपनीचे चालक व मालक यांनी चोरी करून त्यावर त्यांच्या कंपनीचे स्टीकर लावून व्यवसायासाठी वापरल्या. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२४ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत अंबड एमआयडीसी मध्ये घडला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!