भाजप कामगार मोर्चाच्या मध्यस्थी नंतर इगतपुरी महिंद्रा प्लांटमधील कामगारांचे आंदोलन मागे

Cityline Media
0
इगतपुरी बोधिवती देहाडे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या इगतपुरी येथील प्लांट मधील एनएपीएस अंतर्गत ऑपरेटर ग्रुपने विविध मागण्यां संदर्भात मुख्य दरवाजाजवळ थांबून बंद पुकारला,मात्र,भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने मध्यस्थी करीत कामगारांच्या सर्व मुख्य मागण्या व्यवस्थापनासमोर मांडून पूर्ण केल्या.
भाजपा कामगार मोचचे शहराध्यक्ष हेमंत जनार्दन नेोहेते आणि उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनकारकांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कामावर पुन्हा रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले.

इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड प्लांटमध्ये
एनएपीएमअंतर्गत ऑपरेटर समूहाने गेटवर थांबून बंद पुकारला होता.भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाला ही माहिती मिळताच मोर्चाचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक युवा कामगारांसह चर्चेनंतर प्रमुख पाच मागण्या शॉप फ्लॉवर वर होत असलेले मानसिक त्रास थांबवावे.शासन निर्णयानुसार वर्षभरात वाढीव देण्यात यावे.कामाच्या ठिकाणी सर्व पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्रिपमेंट्स उपलब्ध असाव्यात, त्यांना कोणतीही मर्यादा नसावी. इमर्जन्सी हाफ डे तत्काळ लागू करू नये.

कॅन्टीनमध्ये नाश्त्याचा लाभ मर्यादित नसावा आदी मागण्या कामगारांनी केल्या. या सर्व मागण्यांवर व्यवस्थापनासमवेत चर्चा झाली आणि यावर सहमती झाली. काही युवा कामगार अधिक सोयींसाठी कायमस्वरुपी अधिकार मिळावे असे आग्रही होते,परंतु व्यवस्थापनाने ही मागणी मान्य केली नाही.

भाजपा कामगार मोर्चाच्या शहराध्यक्षांनी तरुणांना सांगितले की,ही समस्या महिंद्रा कंपनी सोडवू शकत नाही.हा प्रश्न राज्यस्तरीय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या दरवारी मांडला जाईल, सर्वांनी कामावर पुन्हा रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व कामगार हजर झाले.याप्रसंगी महिंद्रा व्यवस्थापक गजरे, तिवारी, माळोदे आणि भाजपा कामगार मोर्चाचे नरेंद्र पाटणे, विवेक बिराडे,अनिकेत कदम,योगेश चांदवडकर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!