नेहमी प्रमाणे उभ्या असलेल्या ट्रक मधून नऊ लाखांच्या केबलची चोरी करणारे जेरबंद

Cityline Media
0
नाशिक दिनकर  गायकवाड उभ्या असलेल्या ट्रकमध्ये ड्रायव्हर व क्लिनर झोपलेले असल्याची संधी साधून ट्रकमधील नऊ लाख रुपये किमतीची नऊशे किलो वजनाची केबल चोरून नेणाऱ्या दोघा युवकांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी पंकज गौतम मेश्राम (रा. शिवलकरनगर, नागपूर) हे ट्रकचालक आहेत.मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम सुरू असल्यामुळे एमएच ०४ एमएच ४७४३ या क्रमांकाचा ट्रक नाशिक-पुणे रोडवरील उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या कडेला सिन्नर फाट्याकडून

येणाऱ्या रोडवर बॅरिकेडिंगच्या पाठीमागे उभा करून फिर्यादी मेश्राम व क्लिनर हे दोघे ट्रकमध्ये झोपले होते. ही संधी साधून संशयित तारासिंग चरणसिंग शिकलकर व येसूसिंग मनूसिंग शिकलकर (दोघेही रा. शिकलकर वस्ती, सिन्नर फाटा, नाशिकरोड) यांनी ट्रकमध्ये असलेली नऊ लाख रुपये किमतीची नऊशे किलो वजनाची केबल व केबलचा ड्रम असा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून,पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!