लोणी ज्ञानेश्वर साबळे अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांनी दिव्यांगात्वावर मात करत आपली अभिनेता म्हणून एक नवी ओळख निर्माण केली त्याचा राहाता तालुक्यातील लोणी येथे आरंभ ट्रेड सॉलिशन्स यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सध्या लोकप्रिय असलेले गाणे झटपट पटापट या गाण्याची लोकप्रियता लहानापासून मोठ्यापर्यंत महाराष्ट्रभर क्रेझ वाढत आहे तसेच,द फार्म हाऊस हा मराठी चित्रपट ऑल महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटामुळे सर्वत्र त्यांच्या चाहता प्रेक्षकाची वाढ होत आहे.
लोणी येथे आरंभ ट्रेड सॉलिशन्स यांच्या वतीने त्यांचा सत्कार भाऊसाहेब पगारे समाजसेवक यांच्या हस्ते दिग्दर्शक प्रमोद पंडित यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी लोणी येथे आरंभ ट्रेड सॉलिशन्स सत्कार यावेळी सत्कार करताना राजेंद्र ब्राह्मणे, सी एम डी. सुनील रूपवते बाळासाहेब सोनवणे, आदिल कादरी शरद सुपेकर योगेश पेंढारकर, विजय गाडेकर महाराज,यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी त्यांच्या अभिनयाचे व कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
