नाशिक दिनकर गायकवाड घरात एकट्या असलेल्या मुलीला अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याची घटना अशोकनगर येथे घडली.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
फिर्यादी यांची मुलगी अशोकनगर येथील घरी एकटी होती. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही. म्हणून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती मिळून आली नाही.या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बटुळे करीत आहेत.
