दुध घेऊन पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची पोत हिसकली

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दूध घेऊन घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची पोत मोटारसायकलीवरील खेचून नेल्याची घटना पंचवटीत नुकतीच घडली.
                छाया रेखांकन-प्रकाश कदम 
या घटने बाबत सविस्तर वृत्त असे की चोरट्याने बळजबरीने फिर्यादी छाया प्रकाश मुळे (रा. पेठ रोड, पंचवटी) या अश्वमेधनगर रिक्षा स्टॉप जवळून दूध घेऊन घराकडे पायी जात होत्या.त्यावेळी कर्णनगर रोडवर किराणा दुकानासमोर त्या आल्या असता समोरून एका स्कूटरवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने मुळे यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची दीड लाख रुपये किमतीची सोन्याची पोत बळजबरीने ओढून चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!