शतक सिनेमा संगमनेरातील सिनेमागृहात लावा;अन्यथा आंदोलन

Cityline Media
0
शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकास इशारा

संगमनेर प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेला ‘शतक’ हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत असून विविध शहरांमध्ये त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र संगमनेर शहरातील मालपाणी मल्टी प्लस या  चित्रपटगृहात अद्याप या चित्रपटाचा एकही शो लावण्यात आलेला नाही,याबाबत शिवसेना-भाजपा महायुतीच्या वतीने नाराजी व्यक्त करत  शतक हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यातयावा यासाठी चित्रपटगृह व्यवस्थापक यांना निवेदन देऊन लवकरात लवकर हा चित्रपट पूर्ण केल्यास आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपा महायुती युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजपा महायुती यांच्या वतीने चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देत ‘शतक’ चित्रपटाचे तात्काळ नियमित शो सुरू करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समाजकार्याचा इतिहास आणि योगदान जनतेपर्यंत पोहोचावे, हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक प्रेक्षकांकडून चित्रपटाची मागणी असतानाही तो प्रदर्शित न करणे ही खेदजनक बाब आहे.

यावेळी महायुतीच्या वतीने व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा शिवसेना शहर पमुख विनोद सूर्यवंशी भाजप तालुका सरचिटणीस महेश मांडेकर  शहर सरचिटणीस भारत गवळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख दिपाली वाव्हळ, शिवसेना उपतालुका प्रमुख रंणजीत जाधव पूजा अरगडे रणजीत गायकवाड वरद बागुल शशांक नामन ,युवा सेना उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख तालुकाप्रमुख सुशील शेवाळे शहरप्रमुख सार्थक शेवाळे , युवती शहरप्रमुख शिवाज्ञा अरगडे अविनाश फटांगरे प्रणव सातपुते राहुल पखळे सुनील चांडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!