संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील जोर्वे येथील आंबेडकर नगर येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव महिला मंडळ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रसिद्ध शिव,शाहू,फुले आंबेडकर व संविधान प्रेमी,पुरोगामी प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे प्रवचन झाले.
कार्यक्रमास तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा तथा एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक,अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व माता रमाई यांना अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थित आंबेडकरी अनुयायांना रमाई जयंती निमित्त शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.
प्रसंगी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी सुश्राव्य वाणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित ओव्या सादर केल्या. या ओव्यांनी माता रमाई यांनी सहन केलेला दुःख प्रसंगाचे जिवंत चित्रण झाले आणि अनेक उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, माणिक यादव,जोर्वे गावच्या सरपंच प्रीती दिघे,राष्ट्र सेवा दलाचे राज्याचे अध्यक्ष अनिकेत घुले,सह्याद्री विद्यालयाचे मा.प्राचार्य एम वाय दिघे, ह. भ.प.वामन महाराज,निवेदक रामदास काकड,
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बंटी यादव, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड,रिपाइं गवई गटाचे जिल्हा सरचिटणीस दादासाहेब यादव, रिपाइं गवई गटाचे संगमनेर तालुका अध्यक्ष साहेबराव यादव,सामाजिक कार्यकर्ते दिलीप यादव,
सामाजिक कार्यकर्ते सचिन मोकळ,वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते गौतम चव्हाण ,मा.कृषी अधिकारी विश्वास चव्हाण, जोर्वे ग्रामपंचायत सदस्य दिगंबर इंगळे,शिवाजी यादव,संपत चव्हाण, सुभाष गायकवाड, बाबासाहेब चव्हाण, प्रमोद इंगळे, संदीप यादव, रावसाहेब यादव, सत्यजित थोरात,अनिल गायकवाड,
सुभाष चव्हाण, नामदेव गायकवाड,बाळासाहेब चव्हाण,अशोक गायकवाड, बाळासाहेब कोळगे,बाबू रूपवते, बापू यादव,मोहन गायकवाड,सागर यादव, भाऊराव गायकवाड,गौतम यादव, जीवन यादव,अनिल भालेराव, अजय चव्हाण,विजय आढाव,श्रीकांत यादव,
संदिप रुपवते,प्रशांत गायकवाड, गोकुळ रूपवते,सचिन गायकवाड,सिद्धार्थ यादव,रवींद्र यादव,दीपक यादव,तसेच रमाई जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी गेले पंधरा-वीस दिवस कसोशीने प्रयत्न करणाऱ्या महिला अलकाबाई चव्हाण बबईबाई गायकवाड, छायाबाई यादव, सीताबाई यादव,छायाबाई रुपवते, कमल मोकळ, शोभा गायकवाड, सुरेखा यादव,आदी उपस्थित होते.तसेच यावेळी गायक प्रवीण गायकवाड व गायिका प्रियंका गायकवाड यांनी माता रमाईंचे गीत गाऊन उपस्थित आंबेडकरी अनुयायांना भावनिक केले.
