म्हैसगाव कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील डॉ.सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण,शिस्तबद्ध व भावनिक वातावरणात नुकताच पार पडला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुभाष बन्सी काकडे हे होते.प्रमुख उपस्थितीत बी.एस. कडू पाटील सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य गारुडकर एस. एन. मुसळे एस. बी.तसेच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. निलेश पर्बत यांची प्रमुख उपस्थिती व्याख्यान केले त्यांना यावेळी प्रत्येक शब्द विद्यार्थ्यांचे मन भरली भावनिक झाले.
डॉ सुभाष काकडे ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीचा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षण,शिस्त, संस्कार व ध्येयवाद यांचे महत्त्व पटवून दिले .अध्यक्षीय यांनी भाषणातुन डॉ. सुभाष बन्सी काकडे यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास ठेवून समाजोपयोगी कार्य करत यशस्वी जीवन घडवावे दिली , असे मोलाचे त्यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्य गारुडकर एस.एन. यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तर प्रा. निलेश पर्बत यांनी आपल्या प्रभावी शैलीतील प्रेरणादायी व्याख्यानातून विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम करण्याचा संदेश दिला.यावेळी प्राचार्य संभाजी माने गागरे त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.
यावेळी बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.त्या मधील अनेक क्षण भावनिक ठरले.या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,पालक, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उत्तम प्रकारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वादिष्ट व सुयोग्य भोजनामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.हा निरोप समारंभ सर्वार्थाने यशस्वी व प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
