राष्ट्र सेवा दल कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर यांची निवड

Cityline Media
0
अध्यक्षपदी राम चन्ना,सचिवपदी रवी दिवे यांची सर्वानुमते निवड. 

संगमनेर प्नतिनिधी राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राची बैठक नुकतीच स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक, संगमनेर येथे नुकतीच उत्साहात पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्र सेवा दल संगमनेरचे अध्यक्ष राम चन्ना यांनी भूषविले.बैठकीच्या प्रारंभी राष्ट्र सेवा दलाच्या विचार धारेवर, समाज प्रबोधन,युवक संघटन,संविधान मूल्यांचे संरक्षण तसेच लोकशाही बळकटीकरण याबाबत चर्चा करण्यात आली.आगामी काळात तालुक्यात संघटनेच्या कार्याचा विस्तार करत सामाजिक, शैक्षणिक व लोकजागृती उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रसंगी राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अनुराधा आहेर यांची कार्याध्यक्ष पदी,रवी दिवे यांची सचिव पदी, तर विश्वनाथ भुजबळ यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येयधोरणांशी निष्ठावान राहून कार्य करण्याची ग्वाही दिली.यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राम चन्ना यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच छात्र भारती संघटनेच्या राज्याध्यक्षपदी अनिकेत घुले यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या बैठकीसाठी हिरालाल पगडाल, राजा अवसक, सिताराम राऊत, समीर लामखडे, संदीप काकड,रजत अवसक, उज्वला कर्डिले, प्रा. बेनके, बंटी साळवे, नईम इनामदार, अर्जुन वाळके, श्रीनिवास पगडाल यांच्यासह राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजातील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचा समारोप राष्ट्र सेवा दलाच्या कार्यविस्तारासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प करून करण्यात आला.

राष्ट्र सेवा दल परिवर्तनवादी, त्यातूनच माझी जडणघडण.
पुर्वी ग्रामीण भागात सेवादलाच्या शाखा भरत असत.मी या शाखेत जात असे. माझी वैचारीक जडणघडण या शाखांमधूनच झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसेवा दलाची एक सैनिक ते कार्याध्यक्ष हा प्रवास माझ्या सामाजिक कार्यासाठी खुप प्रेरणादायी आहे.
अनुराधा आहेर या संगमनेर अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यां असुन त्या कवयित्री, लेखिका आहेत.त्यांना आजअखेर अनेक सामाजिक व साहित्यिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!