शिर्डी अजय जगताप राहाता तालुक्यातील निमगाव येथील युवा निमगाव ग्रामस्थ आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती व श्री दत्त महाराज व महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमगाव येथे दिनांक १७ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून येथील ठिकाण श्री क्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे.
आज १७ फेब्रुवारी क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होत १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळा निमगाव व प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव ह्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होईल.
१९ फेब्रुवारी संतोष महाराज आढावणे यांच्या वाणीतुन भव्य संगीतमय श्री भागवत कथा सायंकाळी सात वाजता सुरू होईल २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री दत्त भगवान व महादेव मूर्ती यांची भव्य अशी शाही मिरवणूक निमगाव गावातून होईल,
२७ फेब्रुवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सकाळी साडेदहा वाजता परमपूज्य महंत श्री रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद होईल या सर्व कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व आहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे व
युवानेते डॉ. सुजय विखे जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्ष सौ.शालिनी विखे व सौ.धनश्री विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व भावी भक्तांनी शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजक निमगाव युवा ग्रामस्थ व समस्त ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून करण्यात येत आहे हा कार्यक्रम यशस्वी साठी गावातील सर्व शिवप्रेमी व युवक, जेष्ठ ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.
