फसवणूक करून अल्पवयीन मुलीस गर्भवती करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

Cityline Media
0
अहिल्यानगर प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध ठेवुन गर्भवती करणारा आरोपीस अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडुन नुकताच जेरबंद झाला.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की,आरोपी नामे हमीद शौकत सय्यद रा.लोंढे मळा,कल्याण रोड ता. जि.अहिल्यानगर याने फिर्यादी यांची अल्पवयीन नात (वय१७) हिचेशी तिचे अज्ञानाचा गैरफायदा घेवुन तसेच तिला लग्नाचे अमीष दाखवुन वारंवार तिच्याशी शारिरिक संबंध ठेवुन तिला गर्भवती केले आहे.

या घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. १०३/२०२६ भारतीय न्याय सहिंता २०२३ चे कलम ६४(२)(एम), ६९, ३५१(२)(३), सह बालकांचे लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनिय २०१२ चे कलम ४, ६, ८, १'१२ गुन्हा दाखल आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक दिपक मेढे पोलीस अंमलदार गणेश लबडे,फुरकान शेख, दिपक घाटकर,बाळासाहेब नागरगोजे,सुनिल मालणकर,योगेशे कर्डिले,महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे,ज्योती शिवाजी शिंदे, सुर्वणा गोडसे, चालक उत्तरेश्वर मोराळे,अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन सदर गुन्ह्यातील आरोपीस शोध घेवुन तात्काळ ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

वरील पथकाने गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हमीद शौकत सय्यद रा. लोंढे मळा, अहिल्यानगर याचे शोध घेत असतांना पथकास खबऱ्यामार्फत गुन्ह्यातील आरोपी हा आण्णाभाऊ साठे चौक,लाल टाकी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने या ठिकाणी जावुन खात्री करता लाल टाकी परिसरात एक इसम संशयित रित्या उभा असल्याचे दिसुन आला.तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव हमीद शौकत सय्यद वय - २४ वर्षे रा. लोंढे मळा,कल्याण रोड, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.

पथकाने ताब्यातील आरोपी नामे हमीद शौकत सय्यद वय - २४ वर्षे रा.लोंढे मळा,कल्याण रोड,अहिल्यानगर यास पुढील तपासकामी तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस ठाणे हे करीत आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक  सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही केलेली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!