नाशिक दिनकर गायकवाड सर्व्हिस सेंटरवर धुण्यासाठी आलेली कार व त्यातील २० हजार रुपयांची रोकड घेऊन तीन जण पळून गेल्याची घटना नांदूर नाका येथे घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी सतीश जयवंत तांबे (रा. मुशीगाव, ता. जि. पुणे) व त्यांचे मित्र अनिकेत वाघमारे असे दोघे जण दि. ७ फेब्रुवारी रोजी नांदूर नाका येथे नाते टायर्स येथील वॉशिंग सेंटरमध्ये एमएच ४१ एलबी २४०८ या क्रमांकाची मारुती कंपनीची एर्टिगा कार धुण्यासाठी गेले होते.
त्यावेळी फिर्यादीचा मित्र अनिकेत हा गाडीत बसलेला असताना त्यांच्या ओळखीचा आरोपी संदीप गंगाधर शेळके (वय ३७, रा. निर्मळ पिंप्री, ता. राहाता, जि. अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम तेथे आले.त्यांनी कारचा दरवाजा उघडून फिर्यादीचा मित्र अनिकेत याला कारच्या बाहेर ओढून शिवीगाळ केली, तसेच मोटार कार घेऊन पळून जाताना कारमधील २० हजार रुपये रोख व गाडीचे पेपरदेखील घेऊन गेले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.
