नाशिक दिनकर गायकवाड कस्टमरला फोन करीत असता कुरिअर बॉयच्या पाठीवरील बॅगची चेन उघडून लॅपटॉप व रोकड दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना आर. टी. ओ. कॉर्नरजवळ घडली.
घडलेल्या घटनेबाबत माहिती अशी की फिर्यादी गौरव लक्ष्मीकांत पगारे (रा. गजवक्रनगर, पेठ रोड) हा कुरिअर बॉय म्हणून काम करतो. पगारे हे कस्टमरला कुरिअर देण्यासाठी पेठ रोड येथे आर. टी. ओ. ऑफिसजवळ थांबले होते. तेथून
कस्टमरला फोन करीत असता पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या ऋतिक मिलिंद रोकडे (वय २६, रा. फुलेनगर, पंचवटी), संकेत भाऊराव शिंदे (वय ३२, रा. मखमलाबाद, म्हसरूळ लिंक रोड, पंचवटी) यांनी फिर्यादीच्या पाठीवर असलेली बॅग उघडून त्यातील कुरिअर, लॅपटॉप व रोकड बळजबरीने काढून घेतली व ते पळून गेले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
