आपल्या मराठी संस्कृतीचा जिवंत आरसा,वाट पाहते राया गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Cityline Media
0
शिर्डी आबा निर्मळ मराठी संस्कृतीचा गाभा,ग्रामीण जीवनाची माती आणि नवरा–बायकोच्या नात्यातील निखळ प्रेम यांचा सुरेख संगम नुकताच एका मराठी गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. दिग्दर्शिका वनिता निर्मळ आणि निर्मातेआबा निर्मळ यांनी धमाकेदार मराठी परफॉर्मन्सवर आधारित एक हृदयस्पर्शी गाणं शूट केलं असून, हे गाणं सध्या चर्चेचा विषय ठरत आहे हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या गाण्यात एक साधी,पण अतिशय भावूक कथा मांडण्यात आली आहे. शेतात राबणारा पती आणि घरी सजून-धजून त्याची आतुरतेने वाट पाहणारी पत्नी—ही केवळ कथा नाही, तर ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो घरांची रोजची भावना आहे. पत्नीच्या डोळ्यातील ओढ, मनातील काळजी आणि नवऱ्याच्या पावलांची वाट पाहणारी नजर प्रेक्षकांच्या काळजाला हात घालते.

निर्माते आबा निर्मळ यांनी या गाण्यातील प्रेमाची लय अचूक टिपली आहे.बैलगाडी, शेत, मातीचा गंध आणि हळूहळू विस्मरणात चाललेली आपली ग्रामीण संस्कृती—या सगळ्यांना या गाण्यातून नवसंजीवनी देण्यात आली आहे. केवळ गाणं म्हणून नव्हे, तर संस्कृती जपण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून हे गाणं समोर येतं.

“आपली कोणी तरी वाट पाहतंय” ही भावना किती सुंदर आहे, हे या गाण्यातून ठळकपणे जाणवतं. एन पी व्हिजन फिल्म प्रस्तुत हे मराठी गाणं वाट पाहते राया प्रेक्षकांना भावनिक प्रवासावर घेऊन जातं.
तसेच या गाण्याचे कलाकार आहे श्री ज्ञानेश्वर थोटे मराठी फिल्म फेम आणि मिसेस राधिका थोटे 
दिग्दर्शन - वनिता निर्मळ 
निर्माते - आबा निर्मळ 
विशेष सहकार्य - महेश निर्मळ (बैल गाडी ) लोकेशन संजूबाबा फार्म
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!