पठारावरील दुर्गम भागाच्या खरशिंदे‌ शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने शिक्षणाला नवे पंख

Cityline Media
0
खरशिदे भैय्या इनामदार संगमनेर तालुक्यातील पठारावरील दुर्गम भागाच्या खरशिंदे गावातील जिल्हा परिषद शाळेत नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाहरुख शेख व ग्रामपंचायत खरशिंदे यांच्या सहकार्याने जियो फायबर उच्चगती इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठी क्रांती घडली आहे.
ऑनलाइन शैक्षणिक व्हिडिओ, डिजिटल पाठ्यपुस्तके आणि आभासी प्रयोगशाळांच्या मदतीने अध्यापन अधिक रंजक व प्रभावी झाले आहे. शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर करता येत असून विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षणीय वाढला आहे.
या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही शहरांप्रमाणेच दर्जेदार शैक्षणिक साधने उपलब्ध झाली आहेत.स्पर्धा परीक्षा तयारी, ई-लायब्ररी आणि शैक्षणिक संकेतस्थळांचा उपयोग करून विद्यार्थी स्वअभ्यासाकडे अधिक आकर्षित होत आहेत.

पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यात संगणक प्रयोगशाळा आणि स्मार्ट वर्गांचीही उभारणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.शाळा प्रशासनाच्या मते, इंटरनेट सुविधा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार आहे.या सर्व सुविधेसाठी मुख्याध्यापक विजय बाजीराव गागरे , शिक्षक मनोहर यादव व  बाळू गावडे  यांनी विशेष प्रयत्न केले.


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!