रेडिओ किसान दिनानिमित्त डॉ. विठ्ठलदास आसावा सन्मानित

Cityline Media
0


चणेगाव प्रतिनिधी-कृषी क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच शेतकरी बांधवांना आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या किसानवाणी, आमचं शेत आमचा परिसर या कृषी विशेष कार्यक्रमातून मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील चनेगाव येथील कृषीभुषण डॉ. विठ्ठलदास बालकिसन आसावा यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
ऑल इंडिया रेडिओ वतीने रविवारी अहिल्यानगर आकाशवाणी केंद्रावर रेडिओ किसान दिवस निमित्ताने आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला . कृषी क्षेत्रात संशोधनाधिष्ठित शेती पद्धतीचा अवलंब, पीक उत्पादन वाढ ,मृदा आरोग्य संवर्धन आदी बाबत शेतकऱ्यांमध्ये नवतंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

डॉक्टर आसावा यांनी आकाशवाणीच्या किसान वाणी तसेच आमचं शेत आमचा परिसर व कृषी विशेष कार्यक्रमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. बदलत्या परिस्थितीत शाश्वत शेती कशी करावी,पीक व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण ,पशुपालन आणि बाजारपेठेतील संधी यावर त्यांनी सोप्या भाषेत केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

डॉक्टर आसावा यांनी स्वयसंशोधित व सुधारित ऊस बेणे प्रक्रिया, हुमणी अळी नियंत्रण प्रकाश सापळा ,सायकल चलित कोळपे , पाचट व्यवस्थापन आदी प्रयोग शेतकऱ्यांनी अवलंब करत कमी खर्चात शेती उत्पादन वाढ साध्य केली आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, सहसंपादक प्रकाश पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रसारण केंद्रप्रमुख डॉ. सचीन सदाफळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील, दहिगावने केव्हीके प्रमुख शामसुंदर कौशिक,आकाशवाणी अहिल्यानगर कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, पाथर्डीचे तालुका कृषी अधिकारी महादेव जोगदंड,राहुरी सिमेन्स स्टेशन सरोज वहाणे आदी उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव वने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा आदींसह प्रगतीशील शेतकरी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!