खरशिदे भैय्या इनामदार शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत,तर विद्यार्थ्यांमध्ये तर्क,संवाद आणि विचार करण्याची क्षमता विकसित करतात आणि पाठ्यक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान देणारे शिक्षक म्हणजे संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय गागरे.
खरशिंदे शाळेसाठी २०२३ -२४ या कालावधीमध्ये बदली होऊन आलेले मुख्याध्यापक विजय गागरे या गावासाठी एक आदर्श शिक्षक म्हणून लाभले ते रुजू झाल्यानंतर शाळेमध्ये विविध कार्यक्रम व शाळा व गावचा परिसर स्वच्छतेबाबतीत कसे? नीटनेटके काळजी घेता येईल या संदर्भात कायमच अग्रेसर राहिलेत.
त्यामुळे ही जिल्हा परिषद शाळा एक अमोघ अनुभव घेत आहे ही शाळा लवकरच केंद्रात व तालुक्यात अग्रेसर कसे? ठेवता येईल यासाठी कायमच मेहनत घेत असतात व पहिली ते पाचवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून व त्यांना कशाप्रकारे मदत करता येईल.
हे मुख्याध्यापक विजय गागरे कामातून कायम जनतेला बघायला मिळते विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधताना बोलताना विद्यार्थी कशी घडवता येईल यासाठी ते नेहमीच वेळोवेळी पालकांना बोलावून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांना बोलून त्यांच्यासमोर आपल्या शाळेविषयी कायमच काही ना काही उपक्रमासाठी नेहमी अग्रेसर असतात.
